महिन्याचं रेशनिंग : सॅनिटरी नॅपकिन्स!
जीएसटी विधेयक लागू झाल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन्सवर १२ टक्के कर लावण्यात येणार आहे. यावर आधी १४.५ टक्के कर आकारण्यात येत होता, म्हणजे तसं पाहिलं तर करात कपातच करण्यात आली आहे. असं असलं तरी अशा जीवनावश्यक वस्तूवर कर असायलाच हवा का, हा प्रश्न आहेच. जिथे कुंकू, टिकली, बांगड्या, पूजेचं साहित्य अशा जीवन-मृत्यू किंवा आरोग्याशी काडीचाही संबंध नसलेल्या वस्तू करमुक्त घोषित होतात, तिथं सॅनिटरी नॅपकिन्सवर कर का?.......